Thursday 11 September 2014



                                मी माझं  -माझं करत आयुष्यभर मोकळं आकाश शोधत होते. आता मिळालं असं वाटतय. बघूया खरच मिळालाय की आताही मलाच वाटतंय.पूर्वीसारखं..........पूर्वी असच  झालं .मिळालं......मला माझं  मोकळं आकाश  मिळाल या धुंदीत मी किती गिरक्या घेतल्या असतील याला काही मर्यादाच नाही. पण....एक क्षण असा आला की तीनं माझ्या गिर्कीला खोडाच घातला. धप्प...........पडले. पार दरीत कोसळले. क्षणात माझं सगळ आकाश  कापरासारखं विरघळून गेलं. तेव्हापासून माझ्या मनान धसकाच घेतला.कुठलच आकाश निवांतपणे बघण्याचं स्वप्न डोळ्यात रुजवायला.

                          आत्ता जे मिळालय  ते मात्र मलाघट्ट मुठीत पकडून ठेवायचंआहे. म्हणूनच आता मी या तयारीला लागणार आहे.

No comments:

Post a Comment