Tuesday 2 September 2014


एखादा क्षण असा असतो की तो पुन्हा-पुन्हा यावासा वाटतो.एखादी ओळख अशी असते की जी कायम रहावी असं वाटत असतं .काय असतं या ओळखीत? या ओळखीत 'मैत्री' सापडल्याचं जाणवतं ही ओळख म्हणजेच मैत्री आपल्यातील कितीतरी त्रुटी कमी करण्यास मदत करते.बघता-बघता ही मैत्री ताना-मनात घुमते आणि घट्ट होते.
कधी-कधी खरचं कळत नाही की ओळखीच्या चार लोकांमध्ये विशिष्ट व्यक्तीशीच का बोलावस वाटतं?तिलाच का खूप काही सांगावस वाटत?हे सगळेच प्रश्न अनुत्तरीत राहतात.मनाचा संबंध असल्यामुळेचं कदाचित हे प्रश्न अनुत्तरीत रहात असावेत. माणसाचं मन केव्हा,कसं वागेल सांगताच येत नाही.
मनाची प्रकृती समज ने नोहे सोपे
मनाची लय समजणे नोहे सोपे.
मैत्री भेटली की तिला जाणीवपूर्वक वाढवायला हवी. मैत्रीचे सगळे नियम पाळले की मग मैत्रीत मजा येते. माझा हा अनुभव आहे तुमचा कसा आहे?

                                        ----------------  मीनाक्षी वैद्य 

No comments:

Post a Comment