Tuesday, 2 September 2014


      शब्द --
शब्द असा असावा जो ,
बांधी मनाच्या रेशीमगाठी .
शब्द असा नसावा जो ,
बांधी मनाच्या निरगाठी .
शब्दांमधुनी झुळ -झुळणारा ,
झरा असावा प्रेमाचा .
शब्दातुनी कधी न व्हावा ,
अपमान त्या भावनेचा.
शब्द असावा श्वास मनाचा,
शब्दच ठेवा या जीवनाचा.
शब्दांमधुनी सूर निघावा
माणुस-माणसास मिळण्याचा


                                 -------मीनक्षी वैद्य

No comments:

Post a Comment