शब्द फुले वेचलीस तू जिच्यासाठी,श्वासाचा हिंदोळा जप तिच्याचसाठी.
तुझ्या प्रत्येक स्वप्नांची ती जोडीदारीण,कौतुकाची फुले उधळ तू तिच्याचंसाठी
तिच्या भेटीचा प्राजक्त हळुवार गंध आणेल,भर-भरून घे ओंजळीत तुझ्या हक्काचा असेल.
तुमच्या सहवासातील रिमझीम कोवळी,एके दिवशी तिच्या अंगभर उलगडेल.
आयुष्यातील हिरवेपण जबाबदारीनं फुलेल,खर्चाचे हिशेब तुझं मन आपसूक रेखेल.
तिला हव्याश्या वळणांवर तू साथ देत चल,तुझ्यातील हळवा मोहोर ती अलवार जपेल
------- मीनाक्षी वैद्य
No comments:
Post a Comment