मन झाले जणू केळयाचे ..घड
आज माझं मन केळ्याचा घड झालं आहें . मनाच्या तळाशी
जपून ठेवलेली एकेक आठवण केळयाला हळुवार सोळावं तसं सोलत मनावर मुक्तपणे
रेंगाळताहेत.. त्यांचं हे रेंगाळण मनावर एक विलक्षण रोमांच उठवतो आहे. खूप
हवा-हवासा वाटणारा. दिर्धाकाळ तो रोमांच मानावर टिकावा असं मनाला
सातत्यानं वाटू लागलं. त्यां च्या अस्तीत्वाच नाद, त्यांचा स्पर्श, मनाला
बेहोष करून टाकु लागलं. या बेहोशीची एक लकेर माझ्या तना-मनात घुमू
लागली...............
मनं बहरे--बहरे आठवणींच्या मुक्त आकाशात ,
आकाश माझा सांगाती आहे मी त्याच्या ऋणात .
वयाची 'बुज' ही सरली दडपणाची नाही कुठली भीती,
मुक्या वयातील मुक्या आठवणीच्या माळा गळा शोभती.
आज होऊ दे बेहोष मला ,विसरू दे नियमांचे बंध,
मस्तीत करू दे 'दंगा' जोडू द्या मज ते रेशीम बंध.
मीनाक्षी वैद्य.
No comments:
Post a Comment