मनातला पाऊस मनातच असा कोसळतो,की मागच्या सगळ्या आठवणीनी चिंब भिजायला होतं.पावसातील फिरणं,ओलं झाल्यावर कशाची तमा न बाळगता ठेल्यावरची गरम-गरम भाजी खाण ,मिरचीचा ठसका लागताच येणार डोळ्यातलं पाणी,मग त्यावर त्याचा जीव कासावीस होण,आणि माझ्या मनात त्याचा कावराबावरा चेहरा बघून हसू फुटण.वा!काय मजा होती त्या वेळेत. तीच मजा आजही मला आली.फक्त त्यावेळेची आठवण होताच.केवढ सामर्थ्य आहे या'आठवणींमध्ये'.
-----मीनाक्षी वैद्य
No comments:
Post a Comment