भेटाव वाटतं कधी-कधी 'एकटेपणाला' एकांतात,
माझं-तुझं न ठेवता विरघळून जावं एकमेकांत.
अवती-भवतीच्या गर्दीत पांघरावं लागतं कातडं,
नसत्या रीतीरिवाजांच असतं भलं मोठं रिंगण कडं.
असते मोठी रांग माझ्याभवती ब-याच भूमिकांची,
कळेना मला कशात दिसेन मी निरागस आणि सच्ची ?
कळलं नाही हे शोधतांना कधी लागलं वळण उतरतं,
आता जपायलाच हवं ,अपघाताला कुठे काय कळतं?
आता शोधाशोध थांबवून भेटणार सरळ एकटेपणाला,
त्यालाच म्हणणार बोट पकडून लाव बाबा मार्गाला.
मार्ग मिळाला तरी मी नाही त्याला सोडणार कधीच ,
या जगात माझ्यासाठी तेच आहे हक्काचं घरं नेहमीच.----
-मीनाक्षी वैद्य.
No comments:
Post a Comment