Wednesday, 17 September 2014

मराठी ब्लॉग विश्व

<div id="marblogwidget_1_6538" class="widget"><script src="http://marathiblogs.net/trackback.js" type="text/javascript">
</script>
<a href="http://marathiblogs.net">
<img  id="marblogimg6538" style="margin: 10px;"
title="The index of all Marathi blogs on the Internet"
src="http://marathiblogs.net/marathiblogs/referral_ping/6538/df7c1ef4fa49e7f5" />
</a><script type="text/javascript">
_ident = "marblogwidget_1_6538";
_img = "marblogimg6538";
refTracker(_ident, _img);
</script>

</div>


Monday, 15 September 2014

                  २००१ साली नागपूरच्या दै. तरुणभारत च्या पुरवणीमध्ये प्रसिद्ध झालेला माझा लेख.


                           मन  झाले जणू केळयाचे ..घड

              आज माझं मन  केळ्याचा  घड झालं आहें . मनाच्या तळाशी  जपून ठेवलेली  एकेक आठवण  केळयाला हळुवार सोळावं तसं सोलत  मनावर मुक्तपणे रेंगाळताहेत.. त्यांचं हे रेंगाळण मनावर एक विलक्षण रोमांच उठवतो आहे. खूप हवा-हवासा वाटणारा. दिर्धाकाळ तो रोमांच मानावर टिकावा असं मनाला  सातत्यानं वाटू लागलं. त्यां च्या  अस्तीत्वाच नाद, त्यांचा  स्पर्श, मनाला बेहोष करून टाकु लागलं. या बेहोशीची एक लकेर  माझ्या तना-मनात घुमू लागली...............
                  मनं बहरे--बहरे  आठवणींच्या  मुक्त आकाशात ,
                  आकाश माझा सांगाती  आहे मी त्याच्या  ऋणात .
                  वयाची 'बुज'   ही सरली  दडपणाची नाही कुठली भीती,
                  मुक्या वयातील  मुक्या  आठवणीच्या  माळा गळा शोभती.
                   आज होऊ दे बेहोष मला ,विसरू दे  नियमांचे  बंध,
                    मस्तीत करू दे 'दंगा' जोडू  द्या मज ते रेशीम बंध.
                                                                                                       मीनाक्षी वैद्य.

Sunday, 14 September 2014

मनी कल्लोळाचे मणी

मनी  कल्लोळाचे  मणी  

 

        मन असहाय  होऊनी  जोडे  उगीच ,मनास नकोश्या  वळणावर 
        जोडूनही स्वत:च  जळत राही ,तरीहे ठेवी मनास खंबीर.
        हा असे नकोसा अट्टाहास  पण...,करावा वाटे त्यास का नकळे,
        गेले सारे जीवन कापरासम  उडून, आता विचाराची च ती धग मागे 
        या धगीची दाहकता  जाळते  शेवटी,  माझी मलाच  शेवटपर्यंत .... 

Saturday, 13 September 2014

                               मनी  कल्लोळाचे  मणी  

 

        मन असहाय  होऊनी  जोडे  उगीच ,मनास नकोश्या  वळणावर 
        जोडूनही स्वत:च  जळत राही ,तरीहे ठेवी मनास खंबीर.
        हा असे नकोसा अट्टाहास  पण...,करावा वाटे त्यास का नकळे,
        गेले सारे जीवन कापरासम  उडून, आता विचाराची च ती धग मागे 
        या धगीची दाहकता  जाळते  शेवटी,  माझी मलाच  शेवटपर्यंत ....      

Thursday, 11 September 2014



                                मी माझं  -माझं करत आयुष्यभर मोकळं आकाश शोधत होते. आता मिळालं असं वाटतय. बघूया खरच मिळालाय की आताही मलाच वाटतंय.पूर्वीसारखं..........पूर्वी असच  झालं .मिळालं......मला माझं  मोकळं आकाश  मिळाल या धुंदीत मी किती गिरक्या घेतल्या असतील याला काही मर्यादाच नाही. पण....एक क्षण असा आला की तीनं माझ्या गिर्कीला खोडाच घातला. धप्प...........पडले. पार दरीत कोसळले. क्षणात माझं सगळ आकाश  कापरासारखं विरघळून गेलं. तेव्हापासून माझ्या मनान धसकाच घेतला.कुठलच आकाश निवांतपणे बघण्याचं स्वप्न डोळ्यात रुजवायला.

                          आत्ता जे मिळालय  ते मात्र मलाघट्ट मुठीत पकडून ठेवायचंआहे. म्हणूनच आता मी या तयारीला लागणार आहे.

मराठी ब्लॉग विश्व

<div id="marblogwidget_1_6488" class="widget"><script src="http://marathiblogs.net/trackback.js" type="text/javascript">
</script>
<a href="http://marathiblogs.net">
<img  id="marblogimg6488" style="margin: 10px;"
title="The index of all Marathi blogs on the Internet"
src="http://marathiblogs.net/marathiblogs/referral_ping/6488/2ce7986b93ac406a" />
</a><script type="text/javascript">
_ident = "marblogwidget_1_6488";
_img = "marblogimg6488";
refTracker(_ident, _img);
</script>

</div>

Friday, 5 September 2014



                       आली झुळूक.........वा-याची

      

                  मस्त-मस्त झुळूक आली वा-याची,
                  त्या टिचकीनं तार छेडली मनाची.
                  त्या धुंद गंधानं मनास वेढले,
                 हळव्या क्षणात ग मी तरंगले.
                 इथून-तिथे सहजच मी गेले,
                 त्यांस अगदी डोळाभर भेटले.
                 तृप्तता साठली मनात पुरेपूर,
                 हा ठेवा पुरेल मज आयुष्यभर.
                 देणे-घेणे हा हिशोबच नसतो मुळी ,
                 विश्वासातच रमली असतात खुळी.



                                                                              मीनाक्षी वैद्य.

                  

                            मन  झाले जणू केळयाचे ..घड

              आज माझं मन  केळ्याचा  घड झालं आहें . मनाच्या तळाशी  जपून ठेवलेली  एकेक आठवण  केळयाला हळुवार सोळावं तसं सोलत  मनावर मुक्तपणे रेंगाळताहेत.. त्यांचं हे रेंगाळण मनावर एक विलक्षण रोमांच उठवतो आहे. खूप हवा-हवासा वाटणारा. दिर्धाकाळ तो रोमांच मानावर टिकावा असं मनाला  सातत्यानं वाटू लागलं. त्यां च्या  अस्तीत्वाच नाद, त्यांचा  स्पर्श, मनाला बेहोष करून टाकु लागलं. या बेहोशीची एक लकेर  माझ्या तना-मनात घुमू लागली...............



                  मनं बहरे--बहरे  आठवणींच्या  मुक्त आकाशात ,

                  आकाश माझा सांगाती  आहे मी त्याच्या  ऋणात .
                  वयाची 'बुज'   ही सरली  दडपणाची नाही कुठली भीती,

                  मुक्या वयातील  मुक्या  आठवणीच्या  माळा गळा शोभती.

                   आज होऊ दे बेहोष मला ,विसरू दे  नियमांचे  बंध,

                    मस्तीत करू दे 'दंगा' जोडू  द्या मज ते रेशीम बंध.

                                                                                                       मीनाक्षी वैद्य.

Tuesday, 2 September 2014



      मनातला पाऊस मनातच असा कोसळतो,की मागच्या सगळ्या आठवणीनी चिंब भिजायला होतं.पावसातील फिरणं,ओलं झाल्यावर कशाची तमा न बाळगता ठेल्यावरची गरम-गरम भाजी खाण ,मिरचीचा ठसका लागताच येणार डोळ्यातलं पाणी,मग त्यावर त्याचा जीव कासावीस होण,आणि माझ्या मनात त्याचा कावराबावरा चेहरा बघून हसू फुटण.वा!काय मजा होती त्या वेळेत. तीच मजा आजही मला आली.फक्त त्यावेळेची आठवण होताच.केवढ सामर्थ्य आहे या'आठवणींमध्ये'.


                                                     -----मीनाक्षी वैद्य

      शब्द --
शब्द असा असावा जो ,
बांधी मनाच्या रेशीमगाठी .
शब्द असा नसावा जो ,
बांधी मनाच्या निरगाठी .
शब्दांमधुनी झुळ -झुळणारा ,
झरा असावा प्रेमाचा .
शब्दातुनी कधी न व्हावा ,
अपमान त्या भावनेचा.
शब्द असावा श्वास मनाचा,
शब्दच ठेवा या जीवनाचा.
शब्दांमधुनी सूर निघावा
माणुस-माणसास मिळण्याचा


                                 -------मीनक्षी वैद्य






    शब्द फुले वेचलीस तू जिच्यासाठी,श्वासाचा हिंदोळा जप तिच्याचसाठी.
तुझ्या प्रत्येक स्वप्नांची ती जोडीदारीण,कौतुकाची फुले उधळ तू तिच्याचंसाठी
तिच्या भेटीचा प्राजक्त हळुवार गंध आणेल,भर-भरून घे ओंजळीत तुझ्या हक्काचा असेल.
तुमच्या सहवासातील रिमझीम कोवळी,एके दिवशी तिच्या अंगभर उलगडेल.
आयुष्यातील हिरवेपण जबाबदारीनं फुलेल,खर्चाचे हिशेब तुझं मन आपसूक रेखेल.
तिला हव्याश्या वळणांवर तू साथ देत चल,तुझ्यातील हळवा मोहोर ती अलवार जपेल

                                                                                                  
                                                                                     -------    मीनाक्षी वैद्य 

एखादा क्षण असा असतो की तो पुन्हा-पुन्हा यावासा वाटतो.एखादी ओळख अशी असते की जी कायम रहावी असं वाटत असतं .काय असतं या ओळखीत? या ओळखीत 'मैत्री' सापडल्याचं जाणवतं ही ओळख म्हणजेच मैत्री आपल्यातील कितीतरी त्रुटी कमी करण्यास मदत करते.बघता-बघता ही मैत्री ताना-मनात घुमते आणि घट्ट होते.
कधी-कधी खरचं कळत नाही की ओळखीच्या चार लोकांमध्ये विशिष्ट व्यक्तीशीच का बोलावस वाटतं?तिलाच का खूप काही सांगावस वाटत?हे सगळेच प्रश्न अनुत्तरीत राहतात.मनाचा संबंध असल्यामुळेचं कदाचित हे प्रश्न अनुत्तरीत रहात असावेत. माणसाचं मन केव्हा,कसं वागेल सांगताच येत नाही.
मनाची प्रकृती समज ने नोहे सोपे
मनाची लय समजणे नोहे सोपे.
मैत्री भेटली की तिला जाणीवपूर्वक वाढवायला हवी. मैत्रीचे सगळे नियम पाळले की मग मैत्रीत मजा येते. माझा हा अनुभव आहे तुमचा कसा आहे?

                                        ----------------  मीनाक्षी वैद्य 


भेटाव वाटतं कधी-कधी 'एकटेपणाला' एकांतात,
माझं-तुझं न ठेवता विरघळून जावं एकमेकांत.
अवती-भवतीच्या गर्दीत पांघरावं लागतं कातडं,
नसत्या रीतीरिवाजांच असतं भलं मोठं रिंगण कडं.
असते मोठी रांग माझ्याभवती ब-याच भूमिकांची,
कळेना मला कशात दिसेन मी निरागस आणि सच्ची ?
कळलं नाही हे शोधतांना कधी लागलं वळण उतरतं,
आता जपायलाच हवं ,अपघाताला कुठे काय कळतं?
आता शोधाशोध थांबवून भेटणार सरळ एकटेपणाला,
त्यालाच म्हणणार बोट पकडून लाव बाबा मार्गाला.
मार्ग मिळाला तरी मी नाही त्याला सोडणार कधीच ,
या जगात माझ्यासाठी तेच आहे हक्काचं घरं नेहमीच.----

            -मीनाक्षी वैद्य.